वृद्ध महिलेस जातिवाचक शिवीगाळ

0

माचला येथील पाच जणांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात अट्रोसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल….

 

 

चोपडा : तालुक्यातील माचला येथे अनुसूचित जातीच्या महिलेस जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माचला येथील 65 वर्षीय वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गावातील जागेच्या वादातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसेच अनुसूचित जातीचा उल्लेख करून अपमानास्पद व जातिवाचक शब्दांचा वापर करत धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

21 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाद घालत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात शिवा एकनाथ पाटील, संतोष एकनाथ पाटील, भोल्या संतोष पाटील, भूषण संतोष पाटील व गोविंदा मच्छिंद्र पाटील (सर्व रा. माचला, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 79, 189(2), 190, 191(2), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(r) व 3(1)(s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!