प्रभाग 13 मध्ये सुनील महाजन यांच्या उमेदवारीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलिसातील समाजसेवक आला राजकारणात…

अमळनेर : शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 (ब) मध्ये एक नवा पण लोकहिताचा मुद्दा वेग घेत आहे. पोलीस विभागात अनेक वर्षे कर्तव्य पार पाडत जनतेची मनापासून सेवा केलेले सुनील महाजन यांनी आता राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुनील महाजन यांनी पोलीस खात्यात काम करताना शिस्त, तत्परता आणि जनतेच्या अडचणींना दिलेली संवेदनशील दाद यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. नागरिकांच्या छोट्या–मोठ्या तक्रारी असोत वा सामाजिक हिताचे उपक्रम, त्यांनी सदैव पुढाकार घेऊन कार्य केले. या सेवाभावामुळे अनेकांना त्यांच्याविषयी विश्वास वाटतो.

सुनील महाजन यांनी सांगितले की,
“पोलीस सेवेत राहून मी लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या. आता राजकारणाच्या माध्यमातून त्या समस्यांचे मूळातून समाधान करण्याची वेळ आली आहे. विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिक प्रशासन हेच माझे ध्येय आहे.”
दरम्यान, प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्थानिक तरुण, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा विशेषतः जाणवतो. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभाग घेतला असून घराघरातून सुनील महाजन यांना प्रचंड समर्थन व्यक्त केले जात आहे.
निवडणूक प्रचाराच्या पहिल्या काही दिवसांतच प्रभाग 13 मध्ये महाजन यांच्या प्रचाराचे वातावरण रंगू लागले आहे. त्यांच्या सेवाभावाची छाप आणि सरळ-साध्या स्वभावामुळे “नगरसेवक नामक मुकुट” देण्याची तयारी मतदारांमध्ये दिसत आहे.
आगामी निवडणुकीत सुनील महाजन यांचे राजकारणातील पहिले पाऊल किती प्रभावी ठरेल, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
