“शिवसेना (उबाठा) उमेदवार राधाबाई पवार यांनी यांनी केली नारळ फोडत प्रचारास सुरुवात”

0

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी

 

अमळनेर : नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी नगरसेविका राधाबाई पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी बंगाली फाईल परिसरात नारळ फोडून आपल्या प्रचाराला विधिवत सुरुवात केली.

राधाबाई पवार या शहरातील परिचित माजी नगरसेविका असून त्या समाजकारणात सक्रिय आहेत. त्या संजुभाऊ मच्छीवाले यांच्या धर्मपत्नी आहेत. कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी घर-दारी भेटीचा प्रचार सुरू करत जनतेशी संवाद साधला.

गोर-गरीब, दलित–आदिवासी विकास माझे प्राधान्य — राधाबाई पवार

प्रचाराच्या सुरूवातीवेळी बोलताना चौहान म्हणाल्या,
“मी गोर गरीब तसेच दलित-आदिवासी बांधवांच्या विकासासाठी नगरसेविका म्हणून काम करताना सदैव प्रयत्नशील राहिले. त्याचेच फळ म्हणून जनतेने मला नगरसेवक हा मुकुट दिला. आता प्रभागापुरते सीमित न राहता संपूर्ण अमळनेर शहराच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला नगराध्यक्ष पदी काम करण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती मी जनतेसमोर करीत आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, शहरातील मूलभूत सोयीसुविधा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, स्वच्छता व्यवस्थापन, तसेच वंचित घटकांसाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे आपले प्रमुख मुद्दे असतील.

राधाबाई पवार यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून आगामी काही दिवसांमध्ये शहरात प्रचाराला अधिक वेग येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!