प्रभाग १ ब मध्ये मोठी राजकीय चाल : पंकज लोहारांचा कैलास पाटलांना पाठिंबा
लोहार यांच्या निर्णयाने निवडणूक समीकरणात बदल; पाटील यांचे बळ अधिक मजबूत

अमळनेर : प्रभाग क्रमांक १ ब मधून उमेदवारी दाखल करण्याची तयारी करणारे पंकज भानुदास लोहार यांनी आपल्या समर्थकांसह एकमताने कैलास पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील निवडणूक चित्रात बदल होत असून, कैलास नामदेव पाटील यांच्याविरोधातील स्पर्धा आणखी कमी होत असल्याची चर्चा मतदारांत सुरू आहे.
कैलास पाटील यांनी प्रभागात अनेक वर्षे सातत्याने केलेले सामाजिक काम, सर्वसामान्यांशी जवळीक राखण्याचा स्वभाव आणि त्यांचा राजकीय अनुभव यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. नामांकनानंतर प्रभागातून मिळत असलेला उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन केलेली कामे, विकासाभिमुख दृष्टी आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे “प्रभाग १ ब चे नगरसेवक – कैलास पाटील” ही घोषणा जोर धरू लागली आहे.
लोहार यांच्या मागे हटण्यामुळे प्रभाग १ मधील निवडणूक अधिक रंगतदार बनली असून, पाटील यांचे बळ आणखी वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
