प्रभाग 10 मधून शुभांगी देशमुख यांची अपक्ष उमेदवारी
संताजीरावांनी केली सलग 30 वर्ष नगरसेवक राहून केली जनतेची सेवा;,
म्हणून जनता म्हणतेय त्यांचाच वारसदार नगरसेवक हवा….
मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद

अमळनेर : प्रभाग क्रमांक 10 मधून शुभांगी प्रवीण देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. नगरपरिषदेत सलग 30 वर्ष सेवा बजावलेले त्यांचे सासरे, दिवंगत संताजीराव गुलाबराव देशमुख यांच्या समाजकार्याची परंपरा पुढे नेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
शुभांगी देशमुख म्हणाल्या की, “बारा बलुतेदारांसह सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा माझा मानस आहे.” उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रभागातील मतदारांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिवंगत संताजीराव देशमुख यांनी दशकांपर्यंत नगरसेवक म्हणून केलेले कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदार शुभांगी देशमुखांकडे लक्ष वेधत असल्याचे चित्र दिसत आहे. तर संताजीरावांनी केली सलग 30 वर्ष नगरसेवक राहून केली जनतेची सेवा, म्हणून जनता म्हणतेय त्यांचाच वारसदार नगरसेवक हवा…. असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
