व्हाइट क्वालर वाळू माफियाची निवडणुकीत उभं राहण्याची तयारी

0

जनआग्रहाचे नाव करून प्रभाग पंधरामध्ये उभं राहण्याची शक्यता….योग जुडून येईल की इंद्र देव नाराज होईल ?

 

अमळनेर : नगर परिषद निवडणुकीची चाहूल लागताच स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, “व्हाइट क्वालर” असलेला कुप्रसिद्ध शासकीय बांधकाम व्यावसायिक व वाळू माफिया तथा अवैध गौण खनिजाची लूट करत असलेला व्यक्ती आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत उभा राहण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, हा उमेदवार ‘जनआग्रह’ व माझे वरीष्ठ सांगत आहेत म्हणून मी उभं राहतोय अस म्हणत, प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून याचा उभा राहण्याचा खरंच योग जुळून येतो की इंद्र देव यावर नाराज होतो हे पाहणे गरजेचे ठरेल.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, वाळू उत्खननाच्या व अवैध गौण खनिजाच्या व्यवसायातून व बांधकाम व्यवसायातून प्रचंड आर्थिक ताकद मिळवलेल्या या व्यक्तीने गेल्या काही महिन्यांत प्रभागात समाजकारणाचे आवरण चढवण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांना हाताशी धरून मतदारांमध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र, या हालचालीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून असा आरोप केला जात आहे की “जनआग्रह” हे फक्त नावापुरते असून प्रत्यक्षात हे वाळू माफियाच्या राजकीय प्रवेशाचे मुखवटे आहेत.

प्रभाग पंधरा हा नगरपालिकेतील अत्यंत स्पर्धात्मक मानला जाणारा विभाग असून, त्यामुळे या नव्या उमेदवाराच्या प्रवेशामुळे विद्यमान नेत्यांच्या समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संदर्भात मत विचारले असता स्थानिक नागरिकांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या. काही नागरिकांनी म्हटलं की, “जो काम करेल तोच आमचा प्रतिनिधी,” तर इतरांनी स्पष्टपणे विरोध दर्शवित “अपराध पाश्वभूमी असलेल्यांना राजकारणात स्थान देऊ नये” अशी मागणी केली.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ‘व्हाइट क्वालर’ खरंच निवडणुकीत उतरलाच, तर ही लढत केवळ राजकीय नसून नैतिकतेचीही ठरणार आहे.

दरम्यान यावर जिल्ह्यातील काही जेष्ठ पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचेही बोलले जात असून आता जनतेने यांना यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!