रिता बाविस्कर यांना पातोंडा परिसरात जनतेचा प्रचंड प्रतिसाद
प्रामाणिक नेतृत्व आणि पारदर्शक कामगिरीमुळे रिता बाविस्कर यांची लोकप्रियता वाढत आहे.

अमळनेर : तालुक्यातील पातोंडा जिल्हा परिषद गटात अलीकडेच एकच नाव सर्वत्र चर्चेत आहे — रिता बाविस्कर! बाविस्कर ह्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठी पातोंडा परिसरातून इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर गावागावातून, समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांना अपार जनसमर्थन मिळत आहे.
बाविस्कर यांच्या भेटीगाठींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महिलांसह सर्व स्तरातून मिळणारे प्रेम हे त्यांच्या लोकाभिमुख कार्याचे जिवंत उदाहरण आहे.
रिता बाविस्कर यांनी यापूर्वी अमळनेर तालुक्यातील विविध शासकीय समित्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय देत, प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने काम करून जनतेच्या मनात घर केलं आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, “रिता बाविस्कर यांनी केलेले काम हे जनतेशी थेट जोडलेले आहे. त्यामुळेच यावेळी जनता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान मतांच्या रूपात करेल,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कार्य — हाच रिता बाविस्कर यांचा संकल्प!
या विश्वासाने पातोंडा परिसरात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.
