प्रभाग क्रमांक 15चे भाग्य बदलवण्यासाठी इंजि. भाग्यश्री जैन–पाटील सज्ज!
उच्चशिक्षित, तरुण आणि दूरदृष्टी असलेला चेहरा – मतदारांचा उद्गार, “नगरसेवक हाच हवा!”

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून सर्वच प्रभागात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे – प्रभाग क्रमांक १५ मधील इंजि. भाग्यश्री जैन–पाटील.
भाग्यश्री जैन–पाटील या उच्चशिक्षित अभियंता असून तरुण, उत्साही आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. विकासाची नवी दृष्टी आणि प्रामाणिक काम करण्याची तयारी यामुळे त्या मतदारांच्या मनात घर करत आहेत. प्रभागातील नागरिकांचा एकमताने आवाज आहे – “काम करणारा, सुशिक्षित आणि तरुण नगरसेवक हवा, आणि तो चेहरा म्हणजे भाग्यश्री जैन–पाटील!”
भाग्यश्री जैन–पाटील या अमळनेरमधील सुप्रसिद्ध व्यावसायिक भावेश जैन यांच्या पत्नी आहेत. भावेश जैन यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक कार्यातील अनुभव आणि सर्वसामान्य जनतेशी जवळीक या दोन गुणांचा फायदा भाग्यश्री जैन–पाटील यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची तयारी, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि महिला–युवकांसाठीच्या उपक्रमांबद्दलचा त्यांचा स्पष्ट दृष्टीकोन यामुळे त्या प्रभागाच्या विकासासाठी सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
“प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन आणि सर्वांसाठी समान संधी” हे ध्येय घेऊन भाग्यश्री जैन–पाटील यांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि सकारात्मक भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आमच्या प्रभागात जनतेच्या अनेक समस्या असून त्यावर आम्ही तोडगा काढण्याचे नियोजन केलेले आहे. प्रभागाचा विकासाच्या दृष्टिने आम्ही योजना आखून ठेवल्या असून मायबाप जनतेनेही आपला आशीर्वाद कायम असू द्यावा हीच विनंती.
भाग्यश्री जैन – पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तथा इच्छुक उमेदवार प्रभाग क्र. 15
