साहेबराव पाटीलांचा प्रभाव संपला का? अमळनेरमध्ये उठली बंडाची लाट

0

अमळनेरात कृषिभूषण साहेबराव पाटीलांविरोधात तीव्र नाराजी – “ज्या पॅनलसोबत असतील, त्यांचा पराभव निश्चित!”

“अमळनेरकर म्हणतात: निवडणुकीपुरतं प्रेम नको, कायमस्वरूपी बांधिलकी हवी!”

 

 

अमळनेर : तालुक्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली असून, कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकेकाळी शेतकरी वर्गात लोकप्रिय असलेले साहेबराव पाटील यांच्याविषयी आज अमळनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला दिसतो. निवडणुका जवळ आल्या कीच ते अमळनेरची आठवण काढतात, आणि निवडणुका संपताच मतदार व शेतकऱ्यांकडे पाठ फिरवतात, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी नागरिक आणि युवकांनी व्यक्त केलेल्या भावना पाहता, साहेबराव पाटील यांना आता अमळनेरकरांनी नाकारल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना “सीजनल नेता” म्हणून ओळखले जात असून, लोक त्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.

“साहेबराव पाटील हे ज्या पक्षासाठी अथवा पॅनलसाठी प्रचार करतील, त्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागेल,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली आहे. त्यांच्या प्रचारामुळे मतदारांमध्ये उलट परिणाम होतो, अशी चर्चा सध्या गावोगावी सुरू आहे.

अमळनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे या नाराजीमुळे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता असून, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये याचा ठळक परिणाम दिसून येईल, असे संकेत मिळत आहेत.

स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आता जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची वेळ आली आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!