फ्रेश पॉईंटचा ‘महाराजा चहा’ ग्राहकांचा ठरतोय लाडका….

0

चांदीच्या कपबशीतून मिळतोय खास चहाचा अनुभव – अमळनेरकरांची पसंती

 

 

अमळनेर : चहाप्रेमींसाठी एक खास ठिकाण म्हणून ओळख मिळवणाऱ्या अमळनेरमधील ‘फ्रेश पॉईंट’ या चहा केंद्राने ग्राहकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे. येथे मिळणाऱ्या विविध प्रकारच्या चहांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे तो म्हणजे ‘महाराजा चहा’ – जो थेट चांदीच्या कपबशीत दिला जातो, आणि त्यामुळे चहाचा स्वाद अधिकच समृद्ध आणि खास अनुभव देणारा ठरतो.

फ्रेश पॉईंट येथे महाराजा चहा, कुल्हड चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, जिंजर टी, साधा चहा, कॉफी, तसेच दूध असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. चहाचे हे इतके प्रकार एकाच ठिकाणी मिळणे हीच मोठी आकर्षणाची बाब ठरत आहे.

यातील महाराजा चहा केवळ चवीलाच नव्हे, तर त्याच्या सादरीकरणामुळेही खास ठरत आहे. चांदीच्या कपबशीत दिल्या जाणाऱ्या या चहामध्ये एक वेगळीच शाही झलक पाहायला मिळते. हीच खासियत अनेक ग्राहकांना आकर्षित करत आहे. अमळनेर शहरासोबतच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील तालुक्यांमधून सुद्धा ग्राहक येथे आवर्जून येत आहेत.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे सर म्हणाले, “फ्रेश पॉईंटचा महाराजा चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. अमळनेरमध्ये मिळणारी ही चव आणि ही विविधता नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही क्वचितच पाहायला मिळते.”

फ्रेश पॉईंटने केवळ चहा नाही, तर एक अनुभव देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच हा ब्रँड आता अमळनेरमध्ये एक ओळख बनवू पाहत आहे.

फ्रेश पॉइंटचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, श्री दत्त मंदिराच्या जवळ, ट्रक टर्मिनस शॉपी, धुळे रोड, अमळनेर

असाल तिथं  चहा मिळवण्यासाठी संपर्क : 7796112894

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!