अमळनेरमध्ये अवैध धंदेवाल्यांची चाल भारी; २ वर्षांत ५ सरकारी कर्मचारी अँटी करप्शनच्या दारी

0

काळे धंदे करण्यासाठी अँटी करप्शनचा गैरवापर….?

 

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात अवैध धंदे करणाऱ्यांनी पोलिस आणि महसूल यंत्रणेलाच टार्गेट करायला सुरुवात केली असून, गेल्या दोन वर्षांत तीन पोलिस आणि दोन महसूल कर्मचारी अँटी करप्शनच्या सापळ्यात अडकवले गेले आहेत. विशेष बाब म्हणजे या सापड्यामागे स्थानिक गुन्हेगारी गटांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अनेकांच्या मतानुसार, अँटी करप्शनच्या या कारवाया म्हणजे भ्रष्टाचार विरोधात लढा नव्हे, तर स्वतःच्या अवैध धंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी रचलेले जाळे असल्याचे बोलले जाते.

या सापळ्यांमध्ये गेल्या दोन वर्षात तीन पोलीस लाच प्रकरणात अडकवले गेले तर महसूल खात्यातील तलाठी व मंडळ अधिकारीही अँटी करप्शनच्या कारवाईत अडकवले गेले आहेत.

या प्रकरणांतून एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे की, अवैध धंदेवाल्यांनी आता प्रशासनालाच हाताळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अमळनेरकरांच्या भावना आणि तक्रारी

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा रोष आता प्रशासनाकडे वळलेला आहे.
अनेक बुद्धिजीवी म्हणतात की , जर पोलिस आणि महसूल यंत्रणा अवैध धंद्यांविरोधात ठोस पावले उचलत नसतील, तर गुन्हेगारांचेच मनोबल वाढेल. अँटी करप्शनचा गैरवापर ही गंभीर बाब आहे.”

अमळनेरमधील काही भागात, बिनधास्तपणे सुरू असलेल्या गुटखा, सट्टा,दारू, अवैध वाळू वाहतूक आणि बनावट मालाच्या व्यवहारांवर पोलिस आणि महसूल विभागाने ठोस कारवाई केली नाही, तर भविष्यातील धोके अधिक गंभीर असू शकतात, असे अनेक बुद्धिजीवी नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाची भूमिका आणि शांतता का?

या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस प्रशासनाची प्रतिक्रिया मात्र फारशी ठळकपणे समोर आलेली नाही. अँटी करप्शन सापड्या मागील “मूल प्रेरणा” आणि “कोणते गट यामागे सक्रिय आहेत” याचा तपास काही यंत्रणांकडून सुरू असल्याचे सुत्रांकडून समजते.

आता खऱ्या पोलिसिंगची गरज

अमळनेर शहरात वाढणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जर प्रशासनाने आता तरी कठोर कारवाई केली नाही, तर पुढे गुन्हेगार व्यवस्थेच्या डोक्यावर बसतील आणि सरकारी कर्मचारी त्रस्त होतील. पोलिस आणि महसूल यंत्रणेकडून पारदर्शक व निष्ठावान कामगिरीची अपेक्षा आता उंचावली आहे.

डॉ. समाधान मैराळे
मुख्य संपादक – दिव्य लोकतंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!