तलाठ्यांना वाळू माफियांची धक्काबुक्की व दमदाटी….

0

पोलिसात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल

 

 

अमळनेर : तालुक्यात वाळू माफियांची मोठी मजल वाढली असून ते आता प्रशासनाला देखील धक्काबुक्की व दमदाटी करू लागले आहेत. असाच एक प्रकार काल गुरुवारी संध्याकाळी घडला आहे. गुप्त माहिती व तहसीलदार सुराणा यांच्या आदेशानुसार तलाठ्यांचे पथक कारवाईसाठी गेले होते. या पथकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर थांबवले असता त्यांना दोघांनी धक्काबुक्की करत दमदाटी केली. व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून दोघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील मांडळ भागात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याने त्यावर कारवाई करा असे आदेश अमळनेर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी मांडळ तलाठी माळी यांना दिले होते. त्यानुसार इतर दोन तलाठ्यांना घेऊन ते कारवाईसाठी निघाले होते. मात्र जवखेडे गावाजवळ एक ट्रॅक्टर वाळू घेऊन जात असल्याची खात्री झाल्यावर तलाठ्यांनी त्याला ट्रॅक्टर थांबवण्याचे सांगितले, व विचारपूस केली असता त्याकडे कुठलेही परमीट नसल्याने तलाठ्यांनी त्याला अमळनेर तहसील कार्यालयात ट्रॅक्टर नेण्यास सांगितले मात्र तेवढ्यात तेथे सातरणे जि. धुळे येथिल गोपाल बाळू पाटील व मांडळ येथील अजय ईश्वर कोळी असे आले असता त्यांनी व त्यांनी तलाठ्यांना धक्काबुक्की करत दमदाटी करत ट्रॅक्टर पळवून नेले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या बाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!