बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांची डोकी ठिकाणावर आहेत का ?
1 रोजी भरती न कारण्याचे आदेश आणि 10 रोजी जाहिरात ?
बेरोजगारांची लूट थांबवण्यासाठी 24 रोजी निंबा पाटलांचा उपोषणाचा इशारा

अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या बेरोजगारांनाच लुटण्याचा घाट घालत असल्याचे बोलले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या काही महिन्यांपूर्वी भरती करण्याचे ठरवले होते. मात्र ही भरती बेकायदेशीर असून ती थांबवावी अशी मागणी होत होती. त्यानुसार दिनांक 1 सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी सदर भरती थांबवण्याचे आदेश बाजार समिती सभापती व सचिव यांना दिले होते. मात्र हे आदेश देऊनही बाजार समितीने एका वृत्तपत्रात 10 सप्टेंबर रोजी सरळसेवा पद भरती बाबत जाहिरात देऊन अर्ज मागवले होते. म्हणून नौकरीच्या शोधत असलेल्या अनेक बेरोजगार तरुणांनी अर्ज भरत परीक्षा शुल्क देखील भरले असल्याचे बोलले जात आहे. मात्र भरती स्थगित करण्याचे आदेश असतांना देखील भरती घेतात , म्हणजे सत्ताधाऱ्यांची डोकी ठिकाणावर आहेत का असा असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान वरील विषयाच्या विरोधात व सदर परिक्षाशुल्क परत देण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते निंबा पाटील हे अमळनेर प्रांत कार्यालयाच्या समोर 24 सप्टेंबर रोजी उपोषणास बसणार आहेत.
