अवैध धंदा सुरू करण्यासाठी 15 हजारांची मागणी….

0

अमळनेरचे दोन पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 

अमळनेर : अमळनेरात जर वाहनांमध्ये गॅस भरण्याचा अवैध धंदा सुरू करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणाऱ्या अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंटरसह ताब्यात घेतले आहेत.

15 हजारांचा लाचेचा विषय तडजोड करून 12 हजारांवर आला व ती रक्कम शहरातील स्वराज पान सेंटर वर ठेव असे सांगितले होते. तक्रारदाराने सदर रक्कम त्या पान सेंटरवर ठेवताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकला व संबंधित पंटरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करून दोन्ही पोलीस शिपायांना देखील ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला असता त्यांनी कारवाई झाल्याचा दुजोरा दिला असून तक्रारदाराने संबंधित पोलीस शिपायांचे नाव अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे व पान सेंटरचे नाव स्वराज पान सेंटर असे सांगितले आहे. 

सदर पोलीस शिपायांनी स्वतःसाठी की इतर कुणासाठी ही मागणी केली यासह सविस्तर वृत्त लवकरच….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!