किरकोळ कारणावरून एकाचा खून….
अमळनेर येथील घटना

अमळनेर : शहरातील पैलाढ जकात नाक्यावर मध्यरात्री किरकोळ कारणावरून एकाच खून झाला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
या बाबत फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे सविस्तर माहिती अशी की, मुकेश भिका धनगर वय ३८ रा. पैलाड हा रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. जकात नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचे कोणाशी तरी भांडण सुरू असल्याचे मयताचा भाऊ दिनेश भिका धनगर याला समजले. घटनास्थळी जाऊन पाहिले असता दोघांमध्ये तंबाखू दिली नाही यावरून वाद सुरू होता. दिनेश त्यांचे भांडण सोडवायला गेला असता आरोपी ने त्यालाही दगड मारला. म्हणून तो घरी जाऊन त्याच्या भावाना बोलवायला गेला. परत येऊन बघितले असता आरोपी निखिल उतकर हा मुकेशला दगडाने डोक्यात व तोंडावर मारत होता. तेथून मुकेशला सोडवून दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
