माजी आमदार शिरीष चौधरींचे शिलेदार आमदार अनिल पाटलांच्या जाळ्याला….
माजी नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अमळनेर : मतदार संघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे शिलेदार तथा कट्टर समर्थक आमदार अनिल पाटील यांच्या गळाला लागले असून त्यांनी रविवारी संध्याकाळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश केला.
माजी नगरसेवक फिरोज पठाण, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक सलीम टोपी, सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांच्यासह इतरांचा हा प्रवेश झाला आहे. माजी आमदार चौधरी हे अमळनेर मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झाल्यापासून ही मंडळी त्यांच्या सोबत होती. व चौधरींची एकदम कट्टर समर्थक मानली जात असत, मात्र आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरीष चौधरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत सक्रिय सहभाग घेतील की नाही या बाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
