रात्रीस खेळ चाले : राष्ट्रवादीचा करण करतोय मारवड भागात अवैध वाळू वाहतूक

0

करणचे अनुकरण करत सहा ट्रॅक्टर करताय अवैध वाळू वाहतूक

 

अमळनेर : तालुक्यात वाळूची मोठी अवैध वाहतूक होत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे याचे एक छोटेशे उदाहरण समोर आले आहे. ते म्हणजे अमळनेर तालुक्यातील मारवड भागात करण साळुंखे नावाच्या एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी…. तो रोज रात्री बोहरा येथील नदी पत्रातुन अवैध वाळू उपसा करत मारवड भागात विकत आहे. कोणी अडवले तर आपल्या लोकप्रतिनिधीचे नाव करण सांगत असतो, असे आमच्या खात्रीशीर सुत्रांनी सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी करणचे ट्रॅक्टर खाकीतील दोघांनी पकडले होते मात्र करणचे ट्रॅक्टर का सोडले गेले हे कारण गुलदस्त्यात आहे.

तर करणचे अनुकरण करत सुमारे सहा ट्रॅक्टर त्या भागात अवैध वाळू वाहतूक करीत आहेत. जेसीबीने हे ट्रॅक्टर भरले जात असून सदर भागातील लोकं यांना त्रासलेले आहेत. सूर्य मावळल्यापासून म्हणजे रात्री सुमारे 9 वाजेपासून सुरू होणारे ट्रॅक्टर सकाळी सूर्य उगवल्यानंतरच बंद होतात.

दरम्यान शासकीय महसुलाची मोठी लुट होत असून पर्यावरणाची देखील हानी होत आहे. म्हणून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून वाळू चोरीस आढा घालावा हीच अपेक्षा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!