वाळू चोरीचे स्टेटस ठेवत प्रशासनाला वाळू माफियांकडून आवाहन….
तर वाळू चोरीवरून भांडण करतांना रेकॉर्डिंग दिव्य लोकतंत्रच्या हाती
वाळू चोरीमुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता
अमळनेर : तालुक्यातील वाळू प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी तालुक्यातील मांडळ गावात असाच प्रश्न उद्भवला होता. मात्र पुन्हा तसा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.
मारवड भागात देखील वाळू मोठ्या प्रमाणावर सुरू असून बोहरा गावातून ही वाळू वाहतून सुरू आहे. रोज मारवड व गोवर्धन येथील 6 ट्रॅक्टर बोहरा येथून वाळू वाहतूक करीत असतात. या बाबत प्रशासनाला माहिती आहे. मात्र तरी प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. तर आज या भागातील वाळू माफियांनी सरळ सामाजिक माध्यमांवर वाळू वाहतुकीबाबत स्टेटस / स्टोरी ठेवत सरळ प्रशासनाला आवाहन दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीत मांडळ गावात धुळे जिल्ह्यातील देखील लोकं अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी येत असून त्यांची व अमळनेर तालुक्यातील वाळू माफियांची भांडण होत असल्याची रेकॉर्डिंग दिव्य लोकतंत्रच्या हाती लागली आहे. प्रशासनाने जर या विषयाकडे लक्ष दिले नाही, तर हा वाद भविष्यात मोठा पेटू शकतो यात दुमत नाही. कारण मांडळ येथील पांझरा नदीत अमळनेर तालुका व धुळे जिल्ह्यातील सुमारे 30 ते 40 ट्रॅक्टर व काही डंपर रोज उतरून अवैध वाळू उपसा करीत आहेत. आणि या लोकांमध्ये एके दिवशी मोठा संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची वाट शक्यता आहे. म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

