मिरवणुकांचा लाड झाला आणि आज अमळनेरचा कायदा सुव्यवस्था धोक्यात आला
राजकीय हस्तक्षेपापाई प्रशासन हतबल…..?

अमळनेर : राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन नेहमी हतबल पडत असल्याचे अनेक वेळेस दिसून येते. असाच काहीसा प्रकार अमळनेरमध्येही दिसत आहे. राजकीय हस्तक्षेपाने मिरवणुकांचा मोठा लाड झाला आणि आज त्याचा परिणाम म्हणजे अमळनेरचा कायदा सुव्यवस्था धोक्यात आला आहे. गणेशोत्सव असो वा ईद ए मिलादची मिरवणूक यांचा खूप लाड प्रशासनाने पुरावलेला आहे. 11 वाजेची परवानगी आणि मिरवणूक सकाळी साडेसहा वाजता संपते तर दुसरी 5 वाजता संपायला हवी तर सात वाजता संपते. आणि या लाडमुळे ही लोकं खाकीच्या डोक्यावर बसली. आणि काल कायदा सुव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न झाला.
दोन्ही धर्म राजकारणाचा वापर हा आपल्या पोळ्या भाजण्यासाठी करीत असतात. थोडं काही करायचं असेल तर आपल्या पुढाऱ्याला फोन करायचा, आणि ते पुढारी प्रशासनावर दबाब टाकून आपल्या लोकांचे लाड पुरवतात, जे लाड योग्य नाहीत.
राजकारणाचा विचार न करता तालुक्याच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे….
राजकारण्यांनी फक्त आपल्या राजकिय भविष्याचा विचार नकरता आपल्या तालुक्याच्या भविष्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्याला भारत पाकिस्तानचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही.
पोलीस निरीक्षकांनी आता कठोर भूमिका घेणे गरजेचे
सोमवारी अमळनेर शहरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही गोष्टी पोलिसांना समजल्या म्हणून शहरात पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर हे स्वतः लक्ष ठेवून होते. स्वतः पोलीस अधीक्षक बंदोबस्ताला येतात हे अमळनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असावे. आणि यामुळे खूप मोठा अनर्थ देखील टाळला आहे. प्रशासकीय कामात किंवा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रशासनावर राजकीय लोकं दबाब टाकत असतात. मात्र आता यांच्या दाबावाला बळी न पडता अमळनेर पोलीस निरीक्षकांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा ही प्रकरणे अजून चिघडण्याची चिन्हे आहेत.
