तहसीलदार रजेवर जाताच वाळू माफियांचा हैदोस सूरु….
प्रभारी तहसीलदारांनी लक्ष देण्याची गरज

अमळनेर : काही दिवसांपासून लुकाछुपी / चोरमार्गी सुरू असलेली वाळू आता मात्र अमळनेर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा रजेवर जाताच जोमात सुरू असलेल्याचे दिसत आहे. पांझरा काठावरील मांडळ गावात सुमारे 20 ते 25 ट्रॅक्टर रोज उतरत आहेत. आणि त्याच ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा होत आहे.
याकडे प्रभारी तहसीलदार सी.यु. पाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे जेणेकडून शासकीय महसूल बुडणार नाही.
अमळनेर येथील तापी, बोरी या नद्यांना पाणी असल्याने आता पांझराकडे वाळू माफियांनी आपला मोर्चा वळवला आहे. पथक देखील रात्री तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात सुस्त झोपेत असल्याचा किंवा निष्क्रिय असल्याचा फायदा घेऊन वाळू माफियांचा रात्रभर हैदोस सुरू असतो.
