दिव्य लोकतंत्रला अज्ञात महिलेचा फोन….
रावसाहेब पाटलांनी अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप

अमळनेर : येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी अनेक महिलांचा छळ केला असून त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असा आशयाचा फोन आज अज्ञात महिलेकडून दिव्य लोकतंत्रला प्राप्त झाला आहे. या फोनच्या माध्यमातून तालुक्यात व प्रशासकीय स्तरावर खळबळ उडू शकते हे नक्की आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील हे बदली व इतर विषयात कारवाईच्या धमक्या देत अनेक महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचा आरोपही अज्ञात महिलेने केला आहे. अनेक महिला ह्या आपापल्या अब्रूसाठी शांत असल्याचेही त्या महिलेने म्हटले आहे. म्हणून त्यांची जोपर्यंत बदली अथवा त्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत कुणीही समोर येणार नाही असे त्या महिलेने म्हटले आहे.
सदर महिलेने सांगितलेले बाकीचे विषय लिहिणे उचित ठरणार नाही. कारण काही विषय सांगता – सांगता त्या महिलेला रडूही कोसळले होते. तर रावसाहेब पाटील यांच्यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करून बदली करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान रावसाहेब पाटील यांची सदर विषयात प्रतिक्रिया घेण्यासाठी भेटीचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
