केंद्र प्रमुख माणूस तात्पुरता विस्तार अधिकारी झाला आणि तोच माणूस सरळ गट शिक्षणाधिकारी ?
अमळनेर गट शिक्षणाधिकारी पदाबाबत जिल्हा प्रशासन उदासीन

अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अमळनेर गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या बाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरु असून त्यांच्या बाबत कायदा पालन संघाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देखील दाखल केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर गट शिक्षणाधिकारी आलेले रावसाहेब मांगो पाटील हे मंगरूळ येथील इंदिरा नगर मधील औद्योगिक वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते उपशिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली मात्र त्याच्या काही काळातच ते तात्पुत्या व अस्थायी स्वरूपात विस्तार अधिकार म्हणून नियुक्त झाले होते. मात्र याच्या नंतर देखील काही काळातच ते सरळ गट शिक्षण अधिकारी देखील झालेले अमळनेर तालुक्याने पाहिले आहे. व आताही ते गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. म्हणून हा घोडबंगाल नेमका जिल्हा परिषद जळगाव यांनी का केला असावा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अनेक पदांवर काम करणारा व्यक्ती जळगाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नसावा याची खात्री आहे. अमळनेर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात एक अनुभवी विस्तार अधिकारी होते. ते रावसाहेब पाटील यांच्या पासून वरिष्ठही होते व त्यांची सेवा देखील जास्त झाली होती. जवळपास 10 – 15 वर्षाचा अनुभव त्यांना असल्याचे समजते. आणि तेच जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी म्हणून काम देखील पाहत आहेत मग अमळनेर गट शिक्षणाधिकारी म्हणूनच त्यांना पदभार का दिला गेला नाही ? त्यांना अमळनेर गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार न देता रावसाहेब पाटील यांचा मार्ग मोकडा करण्यात आला का ? जिल्हा प्रशासन अमळनेर गट शिक्षणाधिकारी पदाबाबत एवढं उदासीन का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
रावसाहेब पाटील हे जळगाव ग.स. सोसायटीच्या संचालक पदावर कार्यरत असून व अमळनेर तालुक्याचे रहिवासीही असल्याने ते याच्या आड मध्ये काही शिक्षक व कर्मचाऱ्यांना धमकावत देखील असल्याची खळबळजनक माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे. म्हणून रावसाहेब पाटील यांचे जळगाव जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात वलय असल्याने त्यांची इतर जिल्ह्यात अथवा अमळनेर येथून तरी बदली करावी अशी मागणी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
