अमळनेरात व्हीआयपी वाळू माफीये झाले सक्रिय…..
इतर माफीये शांत

अमळनेर : तालुक्यात काही दिवस विश्रांती नंतर वाळू माफीये पुन्हा सक्रिय झाले असून यात आता इतर शांत झाले आहेत मात्र फक्त व्हीआयपी वाळू माफीये सक्रिय झाले आहेत.
अमळनेर तालुक्यातील तापी नदीला पाणी असल्यानेही तेथून वाळू वाहतूक होत असून सडावन मार्गे बोरी तर काही गावांमधून पांझरा नदी पत्रातून सर्रास वाळू वाहतूक होत आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नदीतून वाळू काढली जाते व तेथून डंपरने वाहतूक होत असते.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात हुजुरांवर नाराज झालेला चोपदार पी.एस. हा सध्या नाराजी दूर करून वाळू माफियांचा दुवा झाल्याचे कळते. तर पी.एस.चे व त्याच्या 2 साथीदारांचे एका वाळू माफियाच्या सोबत मिळून वाळू वाहतूक करत काही वाहन मांडळ नगरीतून सुरू असल्याचेही कळते.
दरम्यान ही अवैध वाळू वाहतूक प्रशासनाने थांबवावी हीच अपेक्षा !
