संभापती आणि संचालक नाचले मात्र डान्स बार किंवा तमाशात नाही….
कुणाच्या नाचण्याची वाईट चर्चा करत आपण त्यांचं वैयक्तिक स्वतंत्र हिरावण्याचा प्रयत्न करतोय का ?
उलटसुलट चर्चा करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

अमळनेर : शनिवारी रात्री कुठून येत असताना पाऊस सुरू झाला आणि त्याच्या आनंदात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ नाचत असल्याचा व्हीडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. आणि त्याखाली काही गोष्टी लिहीत विरोधक व काही मंडळींनी टिकांचा पाऊस बरसवला. काहींनी तर सरळ या मंडळींना शेतकरी द्रोही देखील घोषित करून टाकले. तर काहींनी म्हटले की बाजार समितीचे पैसे उडवत आहेत. मात्र हे सर्व करीत आपण कुणाचे वैयक्तिक स्वतंत्र हिरावण्याचा प्रयत्न करीत आहोत का ? ही मंडळी कुठल्या डान्स बार किंवा तमाशात नाचताना दिसत आहे का ? असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत.
कुठल्या गोष्टींची चर्चा करताना आपण काय करतोय याचे तरी भान काहिनी ठेवणे गरजेचे आहे. अमळनेर मधील काही मंडळी मुंबई सारख्या शहरात डान्स बार मध्ये नाचण्यासाठी, मौज – मस्ती तथा अय्याशी करण्यासाठी जात असतात. तर काही बहाद्दर तमाशात नाचत असतात मात्र ह्या मंडळींचे तसले काही विषय असतील तर मात्र हे सर्व आरोप खरे म्हणावेत. आणि जर हा सर्व विषय त्यांना लपवायला राहिला असता तर त्यांनी व्हीडिओ कशाला केला असता.
अमळनेरचा शेतकरी पावसाअभावी सुखावला होता. यासाठी आम्ही भद्रा मारुती येथे गेलो होतो व तेथून परततांना पाऊस सुरू झाला व अमळनेर येथेही फोन केला असता अमळनेरातही पाऊस पडला असल्याचे समजले. तेव्हा मात्र सर्व सभासदांना नाचण्याचा मोह आवरला गेला नाही असे सभासदांचे म्हणणे आहे. मात्र या सर्व गोष्टीचा वेगळा अर्थ घेतला व सरळ आरोपांचा पाऊस संबंधितांवर बरसवला.
आमच्या कामात बोट ठेवण्यासारखे किंवा वाईट काहीच सापडत नाही म्हणून असले धंदे होत आहेत व आरोप करणाऱ्या मंडळींनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही संचालक मंडळाचे म्हणणे आहे.
