चोपडा रोड लागत कॉलनीत अनेक डुब्लिकेट वस्तूंची निर्मिती….
जनतेच्या आरोग्याशी खेळ

अमळनेर : शहरातील चोपडा रोड लागत एका कॉलनी भागात अनेक डुब्लिकेट वस्तूंची निर्मिती होत असून यामुळे जनतेच्या आरोग्यासोबत खेळ खेळला जात आहे. म्हणून याकडे अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या कॉलनी भागात काही ठिकाणी गोडाऊन बनवून हे धंदे सर्रास सुरू आहेत.
यात प्रख्यात कंपनीच्या वस्तू घडी डिटर्जंट पावडर, कोलगेट ट्यूब, मॅगी मसाला, झंडु बाम, आयोडेक्स, इनो व एव्हरेस्ट मसाला, 30 नंबर बिडी, शिवाजी बिडी यांसह इतर बनावट वस्तु तयार होऊन बाजारात विकल्या जात आहेत. सदर वस्तू अनेक केमिकल व जीवाला धोका निर्माण होईल अशा मिश्रणांनी तयार होत आहेत. मात्र खरे व खोटे यात फरक समजत नसल्याने ग्राहक कोणतीही वस्तू घेत असतात. आणि यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
त्या भागात अनेक ठिकाणी वस्तू तयार होत असून लहान मुलाच्या खाण्याच्या वस्तूंचा देखील यात समावेश आहे. म्हणून या याकडे अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
