पोलिसांच्या लेखी आश्वासनाने उपोषण स्थगित….
अवैध धंद्यांच्या विरोधात उपसले होते उपोषणाचे हत्यार

अमळनेर : दिव्य लोकतंत्रचे संपादक डॉ. समाधान मैराळे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी कारवाया देखील केल्या होत्या. मात्र हे सर्व धंदे कायमचे बंद व्हावे असे मैराळे यांचे म्हणणे होते.
अमळनेर पोलीस पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी शहरात व तालुक्यात कारवाया केल्या व यापुढे देखील आम्ही कारवाया करून अमळनेर मध्ये सुरु असलेले अवैध धंदे बंद करू असे लेखी आश्वासन देत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संपादक मैराळे यांना पोलिसांनी दिले होते. म्हणून प्रशासनाला सहकार्य करत मैराळे यांनी उपोषण स्थगित केले आहे.
