स्वातंत्र्याच्या ७८व्या वर्षी देखील रेशन नाही…

0

महिलेचा स्वतंत्र दिनी तिरंग्या झेंड्याखाली आत्मदहनाचा इशारा

 

अमळनेर : भारत देश स्वतंत्र झाला आणि बघता बघता उद्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापणास तब्बल ७८ वर्ष होत आहेत. मात्र ७८व्या वर्षातही अशी एक गरीब व गरजू महिला आहे जिला शासनाकडून रेशन म्हणजे धान्य मिळत नाही.म्हणून सदर महिलेने सरळ आत्मदहणाचा इशारा जिल्हाधिकारी जळगाव यांना दिला असून उद्या 15 ऑगस्ट रोजी ही महिला आत्मदाहण करणार आहे.

अमळनेर तालुक्यातील ढेकू खु. येथील महिला सिंधूबाई जनकराव पाटील ही विधवा असून तिला दोन मुलं आहेत, एक मुलगा गावातच सालगडी म्हणून काम करतो तर दुसरा बाहेरगावी हातमजुरीसाठी असतो, सदर महिलेला स्वतःच घर देखील नसल्याने ती भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहे. तिची हलाखीची परिस्थिती असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून गावातील रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी जाते मात्र तिला रेशनच मिळत नसल्याने तिने अमळनेर तहसील कार्यालयाची देखील पायपीट केली. मात्र तीच कुणीही ऐकून घेतले नाही. शेवटी तिने अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदाहण करण्याचा निर्णय घेतला आहे. अमळनेर येथील तहसील कार्यालयाच्या तिरंग्या झेंड्याखाली 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी आत्मदाहण करेल असा इशारा तिने जिल्हाधिकारी जळगाव यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!