पोलिसांचे अवैध धंदे वाल्यांकडून हप्ते….
सरळ जनतेतूनच येताय आता प्रतिक्रिया
अमळनेर : पोलिसांचे अवैध धंदे वाल्यांकडून हप्ते असून ते बंद होणार नाही अशा प्रतिक्रिया आता सरळ जनतेकडूनच यायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध धंदे, अमळनेरातील कायदा सुव्यवस्था व पोलिसांची काम करण्याची पद्धत यावर दिव्य लोकतंत्र आवाज उठवत आहे. त्या बातम्यांवर अनेक वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात हप्ते सुरू असल्याबाबत अनेकांची ओरड आहे.
अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याचीही भीती आमच्या वाचकांनी व्यक्त केली आहे.
म्हणून अमळनेर पोलीस निरीक्षक निकम हे कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असल्याने त्यांची अमळनेर येथून तात्काळ बदली करावी, कारण अमळनेर हे संवेदनशील पोलीस ठाण्यापैकी एक पोलीस ठाणे आहे. गेल्या काहीच दिवसात चाकु हल्ले, चोऱ्या, घरफोड्या, बंदूक आढळणे तर पुणे पोलीस अमळनेर येथे येऊन बंदूक विक्री करणाऱ्याला पकडू शकते तर अमळनेर पोलिसांना हे समजू शकत नाही का की अमळनेर येथे बंदूक विक्री होते ? अमळनेर शहराचे भविष्य पाहुन याठिकाणी चांगला अधिकारी द्यावा असे आवाहन अमळनेरकरी जनतेच्या वतीने दिव्य लोकतंत्र करीत आहे. व तसे पत्र देखील पोलीस अधीक्षक जळगाव यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले आहे.