छडी मिरवणुकीत झालेल्या प्रकारातील दुसऱ्या गटाचा एक जण गंभीर जखमी

0

सदर गटाची तक्रार पोलीस घेत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

 

अमळनेर : येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी छडी उत्सवात झालेल्या हाणामारीत दुसऱ्या गटातील एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला धुळे येथून नाशिक हलवण्यात आले आहे. तर पोलीस आमची तक्रार घेत नसून पोलिसांकडून भेदभाव होत असल्याचे जखमीचे वडील लखन जाधव यानी म्हटले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी छडी मिरवणूकीदरम्यान अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जबर मारहाण झाली होती. तर यात काही लोकांवर चाकुनेही वार करण्यात आले होते. दोन्ही गटांचे लोकं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर एका गटाची सुमारे 19 लोकांच्या विरोधात अमळनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरा गट देखील तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता त्यांचा गुन्हा घेतला नसल्याचे त्या गटाचे म्हणणे आहे.

साहिल लखन जाधव वय 17 हा त्या राड्यात जबर जखमी झाला होता तर राजेश खरारे हा देखिल जखमी झाला आहे. हे दोघे सदर दिवशी उपचारासाठी दाखल झाले होते. त्याचे नातलग अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचे साहिल याच्या वडिलांनी म्हटले आहे. तर गेल्या दोन दिवसापासून आम्ही पोलिसाना गुन्हा दाखल करण्यासाठी सांगत असून तरी आमचा गुन्हा पोलीस घेत नसल्याचे त्याच्या नातलगांनी म्हटले आहे. तर संबंधित लोकं पोलिसांच्या जवळचे असून त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचाही आरोप केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!