अमळनेरचा कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर….
अमळनेरला बीड बनताय का ?
48 तासात दोन चाकु हल्ले, तर चोऱ्याही
अमळनेर : अमळनेरचा कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आला असून गेल्या अठ्ठेचाळीस तासात दोन चाकुहल्ले झाले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे 7 जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जखमींवर धुळे येथे उपचार सुरू असून एखादं दोन अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही चोऱ्या, घरफोड्याही रोज होत आहेत.
दिनांक 7 ऑगस्ट रोजी अमळनेर येथील फरशी रोड वर एक वाद झाला व जमाव जमा होऊन त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यावेळी तिघांवर चाकु हल्ला झाला असून एका वस्तीवरही दगडफेक झाली होती. पोलिसांनी काही काळानंतर तेथे धाव घेतली व जमाव शांत झाला. मात्र या बाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित लोकं गुन्हा दाखल करण्यासाठी येत नसतील तर सरळ दोन्ही पक्षांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यास काय हरकत आहे ? गेल्या काही महिन्यांपूर्वी असे गुन्हे अमळनेर पोलिसात दाखल आहेतच.
दिनांक 7 जुलैच्या घटनेला 48 तास पूर्ण होत नाहीत तो पर्यंत 9 ऑगस्ट रोजी तर शहरात पुन्हा राडा झाला व त्या राड्यातही चौघांवर चाकु हल्ला झाला आहे. एका गटातील तीन व दुसऱ्या गटातीलही एक व्यक्ती जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातही पोलिसांचे काही कर्मचारी उपस्थित असल्याने ह्या जमावाला शांत करण्यात यश आले.
तर शहरात व अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या, घरफोड्या यांसारख्या गुन्ह्यातही वाढ झालेली आहे. काल दुपारी गलवाडे रोड वर घर मालक दवाखाण्यात गेला असल्याचा फायदा घेत घरातून सुमारे 80 लाखांचा लांबविला. तर रात्री अंचलवाडी येथे 3 तर खोकरपाट येथे 2 अशा पाच गायी देखील चोरीस गेल्या आहेत. हे प्रकार कुठं तरी कमी होणे गरजेचे आहे.
काही घडण्यापूर्वी प्रशासनाकडून उपाययोजना सध्या पाहिजे तशा होतांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी अमळनेर पोलीस ठाण्यात काही दिवसांसाठी एक RCP पथक असायचे. छडी उत्सव हा अमळनेरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अमळनेर पोलीस निरीक्षकांनी ह्या गोष्टींचा अभ्यास केला असेल तर मग जास्तीचे पोलीस अमळनेरात का मागवले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान अमळनेर बीड बनण्याच्या मार्गावर आहे का ? कारण अमळनेरचा कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. म्हणून शासनाने याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात व अमळनेरला बीड होण्यापासून वाचवावे.
एवढेच !