तीन वर्ष डीबार झालेला व्यक्ती विद्यार्थी नेता कसा….?
संघटनेच्या वरिष्ठांनी विचारपूर्वक याच्या ढुंगणावर लाथ मारून पदावरून हाकलावे….

अमळनेर : एक कॉपी बहाद्दर गेल्या काही महिन्यांपूर्वी एका परीक्षेत कॉपी करतांना आढळून आल्याने त्याला विद्यापीठाच्या पथकाने सरळ तीन वर्ष डीबार केले आहे. ही माहिती उशिरा प्राप्त झाल्यानंतर आज वृत्त प्रकाशित करीत आहोत.
विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला धुळे येथे विधी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर एका वेगळ्या खोलीत पाटीलकी दाखवत कॉपी करून परीक्षा देणाऱ्या एकाला विद्यापीठाच्या पथकाने तीन वर्षांसाठी डीबार केले आहे. हा व्यक्ती तालुक्यात व अनेक ठिकाणी स्वतःला विद्यार्थी नेता म्हणून मिरवत असतो. मात्र विद्यार्थी नेता असल्याचा दबाव व आपला नातलग विद्यापीठात मोठया पदावर असल्याचे भासवत अनेकांना अशाच प्रकारे या व्यक्तीने दाबून धरले आहे.
जो स्वतः कॉपी करून पास होतो व कॉपी करतांना डीबार होतो असा व्यक्ती विद्यार्थी नेता कसा असू शकतो असा सवाल अनेक लोकं उपस्थित करीत आहेत. तर अशांच्या ढुंगणावर मार द्यावा असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
सदर व्यक्ती हा दोन संघटनांमध्ये मोठ्या पदावर काम करीत आहे. तर यातील एक पक्ष सत्तेत असून त्याच्या आडमध्ये याने बोगस फार्मसी प्रमाणपत्र व इतर अवैध कामेही केली आहेत. म्हणून पक्ष श्रेष्ठीनी या बाबत योग्य विचार करून अशा लोकांच्या ढुंगणावर लाथ मारून पक्ष व संघटनांमध्ये हाकलून द्यावे अशी मागणी जनता करीत आहे.