फार्मसीचे बनावट प्रमाणपत्र बनवून देणारा दलाल अमळनेरात….
लाखो रुपये घेऊन अनेक बनावट प्रमाणपत्र दिले बनवून
अमळनेर : अनेक प्रमाणपत्र, दाखले यांसह अनेक गोष्टी बनावट मिळतात, तसेच फार्मसी प्रमाणपत्र देखील काही वर्षांपासून बनावट बनवून मिळत असून त्याचा दलालही अमळनेरात सक्रिय आहे. हा दलाल दोन संघटनांचा विद्यार्थी विंगचा जिल्हा तसेच प्रदेश स्तरावर पदाधिकारी असून विद्यार्थी नेता म्हणून मिरवत असतो. व असे काळे धंदे त्या आड मध्ये करीत असतो.
याने अमळनेरमध्येच नाही तर राज्यातील अनेक लोकांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले असून त्याचे दर कमीत कमी दोन लाख व त्यापेक्षा जास्तचेही आहेत. जवळचा व्यक्ती असेल तर दोन लाखात व दूरचा असला तर त्याला अनेक रुपायांनी फसवले जाते. त्याच्या सोबतीला काही दु-तोंडी मांडूळ असून ते गोड बोलून लोकांना फसवण्यात ते मदतही करीत असल्याचे कळते.
मंत्री, माजी मंत्री , अनेक आमदार व माजी आमदार तसेच अनेक पुढाऱ्यांशी त्याने जवळीक साधली असून त्याआड मध्ये अनेक काळे कारनामे करीत असतो. आणि याच ओळखीमुळे ते दाबले देखील जात आहेत.
दरम्यान या दलालाचे काही पुरावे आमच्या जवळ आले असून अजून पुरावे गोळा करणे सुरू आहे. त्यानंतर त्याचा चेहरा जनतेसमोर उघड करण्यात येईल.