अमळनेर पोलिसांच्या धाक संपला…. ?
गेल्या महिन्याभरात मोटारसायकल चोरीसह इतर चोरीचे सुमारे 10 गुन्हे

अमळनेर : पोलिसांचा धाक संपला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून अनेक गुन्हे घडले असून त्यात चोरी व घरफोडीसारखे सुमारे 10 गुन्हे अमळनेर पोलिसात दाखल झाले आहेत. त्यात मोटारसायकल चोरी, लहान – मोठ्या चोऱ्या, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे आहेत. तर काही गुन्ह्यात आम्ही शोधून देतो तुम्ही दाखल करू नका किंवा अर्ज द्या अशा प्रकारे काही गुन्हे दाखल झालेले नाहीत, अन्यथा या गुन्ह्यांची संख्या अजून जास्त दिसून आली असती असे जाणकारांचे मत आहे.
एके काळी अमळनेर पोलिसांचे डिटेक्शन आणि कन्व्हेक्षण मध्ये जिल्ह्यात नाव होते. दर महिन्याला तर कधी -कधी आठवड्यात पोलीस अधीक्षक यांच्या कडून अमळनेर पोलिसांचा सन्मान व्हायचा. मात्र सध्या गुन्हे जास्त आणि तपास कमी असल्याचे दिसून येते. म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
गेल्या काळात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या कार्यकाळात अनेक मोठे गुन्हे उघड झाले असून लहान मोठे गुन्ह्यांचा शोध तात्काळ लागत असे मात्र सध्या तसे होतांना दिसत नसल्याने पोलीस अधीक्षक जळगाव यांनी अमळनेर पोलीस ठाण्याबाबत विचार करावा व चांगला अधिकारी अमळनेर पोलीस ठाण्यास द्यावा, कारण अमळनेर पोलीस ठाणे हे संवेदनशील पोलीस ठाण्यातून एक पोलीस ठाणे आहे. असा सूर जनतेतुन उमटत असून काही सामाजिक कार्यकर्ते पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देणार असल्याचेही समजते.
