आई वडिलांची माफी मागत प्रियसीच्या विरहाने प्रेमाच्या युद्धात झाला शहिद

0

अमळनेर येथील घटना; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 

अमळनेर : असे म्हणतात की,  प्रेमाचा विरह अनेकांना सहन होत नाही, हे आपण अनेक चित्रपटातही पाहिले असेल. अमळनेर येथील एक तरुण आई – वडिलांची माफी मागत, प्रियसीच्या विरहातुन प्रेमाच्या युद्धात शहीद झाला आहे. त्या तरुणाने प्रियसी लग्नासाठी नाही म्हणते म्हणून आत्महत्या केल्याची घटना अमळनेर येथील क्रीडा संकुल जवळ घडली.

या तरुणाचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे त्याने गळफास घेण्याआधी केलेले व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्या तरुणीने त्याच्यासोबत प्रेम विवाह देखील केला आणि आता त्यासोबत राहायला नाही म्हणतेय, “मी तुला विसरून गेली तू देखील मला विसरून जा” असे तिने म्हटले असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याने आत्महत्या करण्याच्या आधी व्हिडीओ करत इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली असून तेव्हा अनेकांनी ती पाहिली व ही घटना उघड झाली आहे.

त्याने आत्महत्या करण्याच्या आधी केलेल्या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे की, आई मला माफ कर, तसेच त्याचे वडील व भाऊ यांची देखील त्याने माफी मागितली असून तरुणांनो प्रेमाच्या फांद्यात पडू नका अभ्यास करा…. अभ्यासाकडे लक्ष असू द्या असे म्हटले आहे व त्या मुलीचे नाव घेत तिच्याबद्दलही बोलला आहे.

गौरव बोरसे वय 21 असे या तरुणाचे नाव असून त्याने आज बुधवारी अमळनेर येथील मारवड रस्त्यावरील क्रीडा संकुलच्या बाजूला निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

 सदर घटने बाबत पुढील सविस्तर तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!