पडदे के पिछे क्या है साहब ?
अमळनेरच्या अनेक गल्लीत आहे सट्ट्यांची पिढी, तरी पोलीस निरीक्षकांना दिसत नाही त्यांची सीढी ?

अमळनेर : पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात अनेक सट्ट्यांच्या पिढ्या असून हे धंदे पडदे लावून अमळनेरच्या अनेक गल्ल्यांमध्ये सुरू आहेत. म्हणून “पडदे के पिछे क्या है साहब” असं विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. कारण अमळनेर शहराच्या अनेक गल्ली बोळात सट्टे सुरू आहेत. मात्र पोलिसांना ही बाब माहीत असूनही ते त्याकडे कानाडोळा करीत असून पोलिसांवर होत असलेले आरोप खरे आहेत की काय असा संभ्रम अमळनेरच्या अनेक बुद्धिजीवी मंडळींमध्ये निर्माण होत आहे.

शहरातील जुने बस स्टॅण्ड, मच्छी बाजारातील काही ठिकाणे व त्या जवळच्या काही भागातही पडदे टाकून सट्टे जोरात आहेत. आज दिव्य लोकतंत्रने अनेक ठिकाणील छायाचित्रेही घेतली असून त्यातील काही छायाचित्रे या वृत्तात प्रकाशित करीत आहोत. यारील अनेक स्थळे ही पोलीस निरीक्षक यांच्या निवासस्थानाच्या अगदी जवळची आहेत.
ग्रामीण भागातील सट्टा पिढी वाल्यांकडून प्रत्येकी 1000 हजार रुपये तर शहरातील रेट वेगळे आहेत अशी चर्चा सध्या सुरू असून या बाबतही खात्रीकरून व पुराव्यानिशी तथा सविस्तर वृत्त दिव्य लोकतंत्रकडून लवकरच प्रकाशित केले जाणार आहे.

अवैधरित्या चालणाऱ्या धंदा बद्दल वारंवार बातमी लावून जनसामान्यांना यांची माहिती मिळत आहे, जनता सुज्ञ आहेतच, पण पोलिसांनी यावर भुमिका काय यावर सुध्दा लक्ष ठेवून आहेत, पण तुम्ही पत्रकार म्हणून खूप छान काम करत आहे, असंच पुढेही चालू ठेवा, आज तरी अमळनेर मधील बरेच पत्रकार चिरीमिरीत अटकले आहे, बरेच गोटातून ही माहिती मिळत आहे,