चेंबूरच्या हॉटेल डायमंडची चर्चा ठरली फोल

0

काय आहे सत्यता….नक्की वाचा

 

अमळनेर : गेल्या काही महिन्यांपासून अमळनेर शहरात सुरू असलेला विषय म्हणजे हायप्रोफाईल प्रेम प्रकरण…. आणि शनिवारी तर फेसबुक वरील अमळनेर विधानसभा नामक एका पेजवर सरळ हॉटेलचे नावच जाहीर करण्यात आले. व या बाबत रविवारी दिव्य लोकतंत्रने वृत्तही प्रकाशित केले होते. मात्र वृत्त प्रकाशित झाल्याच्या काही मिनिटातच ह्या सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या. तर गेल्या काही दिवसांपासून या विषयाच्या खोलवर जाऊन तपास देखील दिव्य लोकतंत्र कडून सुरु होता.

शेवटी याबाबत सविस्तर अभ्यास करून सविस्तर तपास देखील झाला आहे. मुंबई मधील चेंबूर येथे हॉटेल डायमंड म्हणून एक हॉटेल आहे. ही बाब सत्य आहे. मात्र ह्या हॉटेल मध्ये अमळनेर मधील दोघे रात्र-रात्र राहत होते हा विषय तद्दन खोटा आढळून आला असून त्या हायप्रोफाईल प्रेमप्रकरणाचा विषय देखील चुकीचा ठरला आहे. हा विषय केवळ दोघांना बदनाम करण्यासाठी रचला गेला असल्याचे जाणकारांचे मत आहे. कारण दिव्य लोकतंत्रने संबंधित हॉटेलशी संपर्क साधला असून आमच्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी भेट देखील दिली आहे. तेव्हा हे सर्व प्रकरण उघड झाले. अमळनेरमधील एकही व्यक्ती गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी गेले असल्याचे आढळून आले.

कोणी दोन्ही लोकं जर सोबत काम करत असतील तर हे गरजेच नाही की त्यांच्यात काही असेलच. अमळनेर हे निर्मळ शहर आहे यात असले विषय शोभत नाहीत. एखादं व्यक्ती कमी काळात उंचीवर गेल्यावर काहींच्या पोटात दुखते व त्यास खाली हाणून पाडण्याच हे एक षडयंत्र असल्याचेही बोलले जात आहे.

कोणाला बदनाम करून कोणाचे ध्येय साध्य होतेय ?
कोणाची उंची कमी करण्यासाठी किंवा आपली उंची वाढवण्यासाठी एखादं महिलेला बदनाम करणे कितपत योग्य म्हणावे ?
कमी काळात पक्षात कोणी मोठे झाले तर कुणाच्या पोटात दुखतेय ?
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि याचेही उत्तर दिव्य लोकतंत्र लवकरच घेऊन येणार आहे.

अमळनेर विधानसभा या पेज बाबत चौकशी

अमळनेर मधील लोकप्रतिनिधी व इतरांची काही लोक बदनामी करीत असतील तर हे योग्य नाही. हे पेज कोण चालवत आहे. व कुठून सुरू आहे याबाबत सविस्तर तपास आमची तांत्रिक टीम करीत असून लवकरच याचाही छडा लागणार आहे.

पुढील वृत्त लवकरच….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!