अनिल भिलला थर्ड डिग्री देणारा बाहेर पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार उज्वल पाटील कोण ?
अनिल भिलला आत्महत्येस भाग पडणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी…. पोलीस अधीक्षकांना निवेदन

अमळनेर : मर्डरर अनिल संदानशिव प्रकरणातील संशयित तथा साक्षीदार अनिल भिल याला आत्महत्येस भाग पडणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्याच्या नातलगांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांना उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी अनिल भिलला थर्ड डिग्री दिली असल्याचा आरोप त्याच्या नातलगांकडून वेळोवेळी होत आहे. तर तसे लेखी निवेदन देखील त्यांनी आज दिले आहे.
आमचा नातलग अनिल भिल हा गुन्हेगार होता तर त्याला न मारता कोठडीत ठेवले असते. मात्र त्याला मारले तर हा कोणता कायदा म्हणावा असा संतप्त सवाल त्याच्या नातलगांनी उपस्थित केला आहे.
मात्र या सर्व बाबतीत बाहेर पोलीस ठाण्यातील उज्वल पाटील या पोलीस शिपायाचेही नाव निवेदनात आले असून हा अमळनेर पोलीस ठाण्यात का गेला होता व त्याने अनिल भिलला का मारले असावे त्याचा या प्रकरणाशी काय संबंध असा सवाल उपस्थित करत अनिल भिलला नातलगांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान सर्व दोषींना निलंबित करावे अशी मागणी अनिल भिलच्या नातलगांनी केली आहे.
