गेल्या काही महिन्यांत अमळनेरात अवैध धंदे वाढले….
अन् वाढले काही अवैध धंद्यांचे हप्तेही ?

अमळनेर : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली असून यातील काही धंद्यांच्या हप्त्यांमध्येही मोठी वाढ झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. यात सट्ट्यांचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे कळते.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांकडे अमळनेरचा चार्ज असतांना त्यावेळी तीन महिने अवैध धंदे पूर्णपणे बंद होते. मात्र त्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काही महिन्यांपासून या अवैध धंद्यांना उत आला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरचेचे आहे.
सट्टा – मटका, पत्ते, दारू, गांजा, गुटखा यांसह अनेक धंदे सध्या जोमात असून हे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे हे लपून राहिलेलं नाही.
पुढील वृत्तात सविस्तर वाचा….
