महाराष्ट्रातील ७२ अधिकारी व काही राजकारणी अडकलेत नेमका तो ट्रॅप कोणता ?

हा हनी ट्रॅप की रासलील

अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून ७२ अधिकारी व काही पुढारी हनी ट्रॅप मध्ये अडकले असल्याची बातमी समोर आली. आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आणि काहींना प्रश्न निर्माण झाला की हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आजचे वृत्त आहे.

सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक, सहायक आयुक्त, पोलिस उपायुक्त, पोलिस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकार्‍यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागणार्‍या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसला, तरी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे.

या हनी ट्रॅप प्रकरणात अनेक अधिकारी अडकल्याने या प्रकरणाला हाय प्रोफाईल स्वरूप आले आहे. हनी ट्रॅपची तक्रार देऊन खळबळ उडवून देणार्‍या महिले विरोधात देखील अनेक तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह पुणे भागातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांविरोधात अत्याचाराच्या तक्रारी देऊन या महिलेने खंडणी उकळल्याचा आरोप आहे. 40 ते 50 लाखांची खंडणी मागून 50 ते 60 हजार या महिलेने उकळल्याचे विविध पोलिस अधिकार्‍यांच्या तक्रारीत नमूद आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्याकडे 25 ते 50 लाखांची खंडणी मागितल्याचे म्हटले आहे. या महिलेने पहिल्या तक्रारी देऊन त्यानंतर प्रतिज्ञापत्र देऊन गैरसमजुतीतून तक्रारी दिल्याचा जबाब नोंदवला. तर, काही ठिकाणी तडजोडीअंती तक्रारी मागे घेतल्या आहेत.

या महिलेनेही पोलिस अधिकार्‍यांविरोधात नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. तर, काही अधिकार्‍यांनी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर संपर्क साधून त्रास दिल्याचे महिलेने म्हटले होते.

नाशिकच्या तक्रारीत 72 अधिकार्‍यांची नावे

नाशिक येथे राहणार्‍या एका महिलेसह ठाण्यात राहणार्‍या एका व्यक्तीने दीड महिन्यापूर्वी ठाणे पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. त्या दाखल तक्रारीत राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, आजी-माजी मंत्री, राजकीय नेते व पोलिस अधिकारी हनी ट्रॅपसारख्या प्रकारात अडकल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे, महिलेने दिलेल्या तक्रारीत सर्व सनदी अधिकार्‍यांची नावे व पद नमूद करण्यात आले होते. त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकाराचा तपास करण्यात येत होता. मात्र, गुन्हे शाखेने या घटनेची चौकशी सुरू केल्यानंतर अचानक तक्रारदार महिलेने आपण ही तक्रार गैरसमजुतीतून केली असून, ही तक्रार परत घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र ठाणे पोलिसांकडे सादर केले होते. या महिलेने दिलेल्या तक्रारीत अनेक अधिकार्‍यांवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.

त्या पंचतारांकित हॉटेलचे कनेक्शन

नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आता समोर येत आहे. अधिकारी, तसेच आजी-माजी मंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना ट्रॅपमध्ये अडकवल्याचे समजते. अधिकारी, तसेच आजी-माजी मंत्र्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याने, हा ट्रॅप की अधिकार्‍यांच्या रासलीला, याचीही सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि बडे नेते दिसत असल्याने, याबाबत कोणीही वाच्यता करण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री व आमदार

हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आजी-माजी मंत्री व आमदार हे उत्तर महाराष्ट्रातीलच असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीत या मंत्र्यांचा नामोल्लेख असल्याचे समजते. मात्र, पोलिस याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नसून, त्यांच्याकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. दरम्यान, हे मंत्री नेमके कोण? याबाबत एकच चर्चा रंगत आहे.

नाशिक-पुणे-मुंबईतील अधिकारी

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या 72 वरिष्ठ अधिकार्‍यांमधील बहुतांश अधिकारी सद्यस्थितीत नाशिक-पुणे-मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे. या अधिकारी, तसेच आजी-माजी मंत्र्यांचे व्हिडीओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

‘राज’ की बात कैसे आयी बाहर

राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर, या ट्रॅपचा ‘मास्टरमाईंड’ हा नाशिकचाच असल्याचे समोर येत असून, तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतची वाच्यता केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.

नाशिक दौर्‍यावर असलेल्या या बड्या राजकारण्याने हनी ट्रॅपची ‘राज’ की बात सांगत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक अधिकारी, ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्या आहेत. तर, नाशिकमध्ये दाखल तक्रार अधिकार्‍याच्या पत्नीचीच असल्याचे कळते.

मात्र हनी ट्रॅप म्हणजे काय ??


हनी ट्रॅप हा सध्या काही वर्षांपूर्वी उगम पावलेला विषय आहे. एखाद्या पुरुषाला एखादी महिला तिच्या जाळ्यात ओढते त्यासोबत मैत्री करते पुढे त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढते. आणि नंतर त्याच्या सोबतचे फोटो व्हिडीओ काढून त्याला ब्लॅकमेल करून त्याकडून खंडणीची मागणी करते.

आता सध्याच्या काळात पुन्हा ऑनलाइन हनी ट्रॅप देखील प्रचलित झाला आहे. यात रोज हजारो लोकं शिकार होत चालले आहेत. कोणत्याही नावाने सामाजिक माध्यमांवर मैत्री होते आणि नंतर व्हिडीओ कॉल होतो. त्यानंतर समोर असलेली महिला ही नग्न स्वरूपात असते. इकडून पुरुष उत्तेजित होऊन नको त्या हरकती करून स्वतःला तिच्या जाळ्यात टाकून घेतो. नंतर व्हीडिओ कॉल रेकॉर्ड करून ती पुरुषाला ब्लॅकमेल करीत असते. आणि त्याकडे पैशांची मागणी करीत असते. हे प्रकरण सध्या देशभरात वाढत चालले आहेत.
नाशिक मधील प्रकार देखील काहीसा असाच प्रकार असून फक्त त्यात ती महिला प्रत्यक्ष आहे.

नाशिक जिल्ह्यात नौकरी केलेले अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात….

दरम्यान या बाबत अजून ठोस असा गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलिसांकडून तपास सुरु आहे. नाशिक किंवा नाशिक जिल्ह्यात ही प्रकरण जास्त घडली असल्याने त्या भागात नौकरीस असलेले अधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण उत्तर महाराष्ट्रातील अनेक आधिकारी हे नाशिक येथे वास्तव्यास असून अनेक अधिकारी सुट्टीच्या दिवशी आपापल्या घरी जात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!