अमळनेरकारांचे आरोग्य चांगले ठेवऱ्या कामगारांचेच आरोग्य धोक्यात…

0

सुरक्षा किट नसल्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात

मुख्याधिकारी तर उदासीनच मात्र कामगार नेतेही ?

 

अमळनेर : शहरातील जनतेचे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या नगर परिषद कामगारांचेच आरोग्य सध्या धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी कामगारांना कोणतेही सुरक्षा किट दिले गेले नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. नगर परिषद अनेक मार्गाने जनतेतून कर गोळा करते, विविध मार्गातून नगर परिषदेकडे पैसा येत असतो. कामगारांना किट देण्यासाठी शासन देखील मदत करीत असते. मात्र अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे कामगारांना जीव दावणीला बांधावा लागत आहे.

सुरक्षा किटमध्ये सामान्यतः हातमोजे, हेल्मेट, सुरक्षा चष्मा, बूट आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणे असतात. जेणे करून त्यांना काम करण्यास अडचण निर्माण होणार नाही व त्यांच्या जीवाला धोका होणार नाही.

सध्या अमळनेर नगर परिषद हद्दीत मोठं – मोठ्या गटारी तयार केल्या गेल्या आहेत. त्या गटारींनामध्ये उतरून हे कामगार काम करीत असतात मात्र अशा वेळी देखील त्यांना सुरक्षा किट नसल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मुख्याधिकारी तर उदासीनच मात्र कामगार नेतेही ?

कामगारांच्या प्रश्नावर सध्या जास्त उदासीन दिसून येतात ते म्हणजे विद्यमान मुख्याधिकारी तथा प्रशासक. मात्र ही उदासीनता कामगार नेत्यांमध्ये देखील उतरली आहे. अधिकाऱ्याने व नेत्यांनी आपल्या कर्मचारी अथवा कामगारांना आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणे वागायला हवे. मात्र हे लोक त्यांच्याशी आपल्या नौकरी असल्यासारखे वागत असतात. आणि त्यांची अशी भूमिका असल्यामुळेच हे लोक कामगारांच्या प्रश्नांवर उदासीन आहेत.

दरम्यान अमळनेर नगर परिषदेने तात्काळ कामगारांना सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावीत हीच अपेक्षा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!