खाशी मंडळाला अनुसूचित जातीची एवढी खाज कशाला ?
संगणक विज्ञानच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत अनुसूचित जातीचे विद्यार्थी नाहीच, तर प्राचार्यही बसेना !
अमळनेर : महाराष्ट्रात नावाजलेल्या शिक्षण संस्थापैकी एक म्हणजे खान्देश शिक्षण मंडळ होय. एके काळी फर्ग्युसन महाविद्यालयानंतर विद्यार्थी प्रताप महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे. साने गुरुजी यांनी याच खान्देश शिक्षण मंडळात शिक्षकाची नौकरी केली. मात्र याच खान्देश शिक्षण मंडळाला जातीयतेची कीड लागली असल्याचे दिसून येते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण कोचर हे सेवानिवृत्त झाले. कायद्याने त्यांची जागा ही वयोमानाने त्यांच्या नंतरच्या प्राध्यापकाला देणे गरजेचे होते. मात्र श्री कोचर यांचा कार्यकाळ वाढवून त्यांनाच आपण प्राचार्य पदी पुन्हा विराजमान करू असा घाट खाशीच्या ना-लायक लोकांनी घातला. (ना-लायक ही शिवी नसून पदाला लायक नसलेले असे समजावे.) श्री. कोचर यांनाच प्राचार्य पदावर कायम ठेवण्याचे कारण म्हणजे कोचर यांच्या परिवाराचे व मित्र मंडळी तसेच नातलग यांचे खूप मोठे मतदार खाशी मंडळात आहे आणि ते आपल्याकडे ओढण्यासाठी कोचर यांना पदावर कायम ठेवून आपला उद्देश साधायचा अशी माहिती समोर आली आहे. आपण जर चांगले कार्य केले असते तर असे घाट रचण्याची वेळ आली नसती हे नक्कीच !
मात्र यावरून यांना अनुसूचित जातीची खाज नाही असे स्पष्ट होत नाही. कारण संगणक विज्ञान या विषयाची दुसरी गुणवत्ता यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. मात्र त्यात एकही अनुसूचित जातीचा विद्यार्थी नसल्याने हे नेमके महाविद्यालयाला व संस्थेला कोणत्या दिशेने घेऊन जाताय हा प्रश्न निर्माण होत आहे.
बढती मधील आरक्षण तर शासनाने रद्दच केले आणि पात्रतेप्रमाणे तेथे वय असूनही प्राचार्य म्हणून नियुक्ती मिळत नाही मात्र शिक्षणात समानता मिळावी यासाठी आरक्षण आहेच. तेथे तरी आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना घेऊ द्या हीच अपेक्षा !
दरम्यान प्राचार्य पदासाठी खाशी मंडळाला कोर्टाने चांगलेच सुनावले असून विद्यार्थ्यांच्या विषयावर मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.