अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर
६० ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार
अमळनेर : तालुक्यातील सुमारे 119 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत आज संपन्न झाली. यात 60 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार असून अनुसूचित जाती ६, अनुसूचित जमाती 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग 32 आदी प्रवर्गांना प्रतिनिधित्व करता येणार आहे. तर सर्वसाधारण 67 ग्रामपंचायती असणार आहेत.
सानेगुरुजी प्रार्थमिक शाळेचा दुसरीत शिकणारा विद्यार्थी कनिष्क संदीप साळी याच्या हाताने आरक्षण सोडत चिट्टी काढण्यात आली.
ही आरक्षण सोडत प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
आरक्षण खालील प्रमाणे