अखेर जितू संदानशिवचा अटकपूर्व जमीन मंजूर…
अमळनेर कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय ; अनेकांच्या भोवया उंचावल्या
अमळनेर : गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने माझ्यावर बलात्कार केला व तेव्हा मी अल्पवयीन होती. असे सांगत आपल्याच नवऱ्यावर म्हणजे अमळनेर येथील प्रख्यात डान्सर व डान्स शिक्षक जितू संदानशिव याच्यावर गुन्हा दाखल करत एका मुलीने प्रेमाच्या नात्याला काळे फासले होते. हा गुन्हा खोटा असून मला अटकपूर्व जामीन मिळावा असे म्हणत जितूने अमळनेर कोर्टात धाव घेतली होती. जीतूचे वकील सलीम खान यांनी कोर्टात मांडलेल्या उत्तम बाजूमुळे व सर्व पुराव्यांचा अभ्यास करून गुरुवारी 3 जुलै रोजी जितूचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.
दिनांक 25 मे 2025 रोजी जितू संदानशिववर त्याच्याच बायकोने बलात्कार, पोस्को व जीवे ठार मारण्याची धमकी वगैरे बाबत गुन्हा दाखल केला होता. यात तिने अनेक आरोप त्यावर केले होते. प्रेम म्हणजे काय असतं ते यामुलीने समजून घ्यावे असे आवाहन तिला अनेकांनी केले होते. महाविद्यालयात प्रेम झाले त्यावेळेस ती अल्पवयीन होती. मात्र त्या प्रेमाला पोलिसात दिलेल्या फिर्यादीत तिने बळजबरी म्हटले होते. मात्र नंतर ही मुलगी पुण्याला तिच्या मावशीकडे फार्मसी शिकण्यासाठी जाते तेव्हा त्या ठिकाणी एक वर्ष राहूनही तिला तिच्या मावशीला किंवा घरच्यांना सांगता आले नाही का असा सवाल उपस्थित होतो. तर त्यांनतर जीतूशी लग्न झाल्यावर सुमारे 5 वर्षानंतर तिला आठवते की, मी लहान असतांना तिचा विद्यमान नवरा असलेला जितू याने तिच्यावर अतिप्रसंग केला हा कोणता गुन्हा आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत जीतूचे वकील ऍड. सलीम खान यांनी तिने दिलेल्या फिर्यादीची चिडफाड केली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून कोर्टाने जीतूचा अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे.
दरम्यान जीतूला मिळालेल्या अटकपूर्व जमीनमुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत.
कोर्टात जितू संदानशिव कडून ऍड. सलीम खान यांनी काम पाहिले.