अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अनेक चेकपोस्टवर पथके तैनात

1

प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या नियोजनाने वाळू माफियांचे धाबे दणाणले

अमळनेर : अवैध वाळू वाहतुकीला आळा बसवण्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मंडळाधिकारी , तलाठी ,पोलीस पाटील आणि कोतवाल यांची पथके नियुक्त केली असून आळीपाळीने गस्त घालण्यात येत आहे. प्रांताधिकारी मुंडावरे यांच्या या निर्णयामुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून मंगळवारी पहाटे – पहाटे दोन ट्रॅक्टर आणि दोन टेम्पोवर कारवाई करण्यात आली आहे.


अमळनेर तालुक्याच्या हद्दीतून बोरी , पांझरा, तापी काठावरून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असल्याची ओरड होत होती. तलाठी पथके अयशस्वी झाल्याने उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी तलाठीची बैठक बोलावून मंडळाधिकारी , तलाठी पोलीस पाटील , कोतवाल यांची पथके नेमून त्यांना रात्री गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. महिला तलाठी अथवा कोतवाल यांनी दिवसा गस्त घालण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

असे आहेत पथके

तालुक्यात प्रत्येक वाळू चेक पोस्टवर नदी काठ परिसरात १ मंडळाधिकारी , ६ ते १२ पोलीस पाटील , ३ ते ४ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) ४ ते ६ महसूल सेवक (कोतवाल) असे २० ते २५ लोकांचे बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

असे असतील चेक पोस्ट

मांडळ चेक पोस्ट -मांडळ ते बाम्हणे फाटा पर्यंत धुळे हद्द पर्यंत , बोहरा चेक पोस्ट – बाम्हणे फाटा ते बोहरा पर्यंत , जळोद चेकपोस्ट – जळोद ते बोहरा पर्यंत. सावखेडा चेक पोस्ट सावखेडा ते जळोद व धरणगाव तालुका हद्द , बिलखेडा फापोरे चेक पोस्ट- सखाराम महाराज मंदिर ,बोरी नदी दोन्ही काठ पारोळा तालुका हद्दीपर्यंत.

२ रोजी सकाळी बिलखेडा शिवारात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या आदेशाने मंडळाधिकारी पी एस पाटील , ग्राम महसूल अधिकारी एम आर पाटील , जितेंद्र पाटील, विकेश भोई यांनी दोन ट्रॅक्टर आणि टेम्पोवर कारवाई करून ते टेम्पो तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.


वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांसोबत पोलीस पाटील आणि कोतवाल यांचीही नियुक्ती केली आहे. तसेच दररोज पथक बदलते राहणार असल्याने कोणीच सेटिंग लावू शकणार नाही.

नितीनकुमार मुंडावरे – प्रांताधिकारी, अमळनेर


प्रशासनाने सर्व पोलीस पाटलांना क्षेत्रे नेमून दिले आहे. रात्री गटाने गस्त घातल्याने अवैध वाळू उपसा नियंत्रणात आला आहे. पोलीस पाटील नदी काठांवर फिरत्या स्वरूपात नजर ठेवून आहेत.

गणेश भामरे – पोलीस पाटील, बाम्हणे

1 thought on “अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अनेक चेकपोस्टवर पथके तैनात

  1. *मठघव्हाण,रुंधाटी,मुंगसे,सावखेडा,येथील महसूल खात्याचे अवैध वाळू चे कलेक्शन देत असणाऱ्या वाळू माफियाची नावे तसेच कोण किती पैसे घेते त्या तलाठीची नाव खालीलप्रमाणे*

    १.सोनू देवरे पातोंडा.
    २.लखन कदम सावखेडा.
    ३.संजय भील सावखेडा.
    ४.आबा अहिरे सावखेडा.
    ५.संजय पाटील धावडे.
    ६.आदित्य कोळी.मुंगसे.
    ७.जितू पवार रुंधाटी.
    ८.नरेंद्र पवार रुंधाटी.
    ९.पिंटू शिरसाठ मठघव्हाण.
    १०.सोमा महाजन दहिवद.
    ११.नितीन भाऊ दहिवद.
    १२.चिक्कू पाटील(टोपण नाव).दहिवद
    १३.राहुल गोसावी. नगाव.
    १४.सागर गोसावी.नगाव.
    १५.विपुल गोसावी.नगाव.

    *कोणत्या तलाठी ला किती सेक्शन दिले जाते ते खालील प्रमाणे*

    १. *प्रकाश महाजन प्रत्येक वाहनाचे १० हजार रुपये महिन्याला*
    या महोदय यांची सजा रुंधाटी प्रभारी
    2. *संदीप शिंदे यांचे प्रत्यक वाहन महिन्याला ७ हजार रुपये महिन्याला*
    3. *माननीय तहसीलदार महोदय यांना प्रति वाहन १० हजार रुपये महिन्याला* प्रकाश महाजन यांच्या कडे होते रक्कम जमा.
    4. *माननीय प्रांत साहेब यांचा नावावर प्रति वाहन १० हजार रुपये गोळा करण्यात येणारे तलाठी प्रकाश महाजन करीत असतात.*

    *अवैध वाळू चे वाहन उतरण्याचे ठिकाण.*

    रुंधाटी-दापुरी.
    मुंगसे-धावडे.
    मठघव्हाण-सावखेडा.
    *अशा ठिकाणाहून सदर वाळू उपसा सुरू असतो म्हणून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कलेक्शन गोळा होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!