महिला असून तहसीलदार लबडेंनी २ किलोमीटर पाठलाग करून पकडले ७ डंपर आणि १ जेसीबी….
आणि अमळनेर तहसीलदारांनी पकडला १ टेम्पो
अमळनेर तहसीलदारांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक

अमळनेर : सोमवारी भुसावळ – जळगाव सीमेवर नदीकाठाच्या जंगलात अवैध गौण खनिज सुरू होते. हे थांबवण्यासाठी महिला तहसीलदार नीता लबडे यांनी स्वतः पुढाकार घेत धाडसी कारवाई केली. व सात डंपर व एक जेसीबी पकडून जमा केले आहेत. ही बाब ताजी असतांनाच आता अमळनेर तहसीलदार यांनी तहसीलदार नीता लबडे यांचे प्रोत्साहन घेत आज शहरात एका रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करत असणाऱ्या तब्बल एका टेम्पो वर कारवाई केली. आणि फोटो देखील काढला. हा टेम्पो पकडताच काही पत्रकारांनीही बातम्या लावत तहसीलदार यांचे मनोबल वाढवले आहे.
दरम्यान या तहसीलदार अमळनेर यांच्या या कारवाईने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन होत असून कौतुक देखील होत आहे.
तर सध्या पांझरा व तापी काठावरील मांडळ, तांदडी, शहापूर, जळोद, सावखेडा, कामतवाडी, धूरखेडा, बोहरा अशा गावांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून तेथे जाऊन कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
