दादू, बाळू, शिरीष व इतर कुणाचे जावई….?
वाळू उपसा होतोय मग यांच्यावर कारवाई का नाही…?

अमळनेर : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना काही वाळू माफियांनी वाळू उपसा बंद केला असून काही हवेत उडणारे मात्र काही तलाठ्यांना हाताशी धरून रोज वाळू उपसा करीत आहेत. त्यांनी रविवारी वाळू उपसा केला असून दिव्य लोकतंत्रच्या सुरू असलेल्या दणक्यांमुळे सोमवारी खंड पडला होता.
दादू, बाळू, शिरीष आणि इतर लोकं हे कुणाचे जावई आहेत जे कुणाचेही ट्रॅक्टर नदीत उतरत नाहीत तर हेच लोकं दादा सारखे नदीत उतरून वाळू उपसा करीत आहेत. एवढेच नव्हे तर एका तलाठ्याचे हे लोकं एवढे जवळचे आहेत की त्या तलाठ्याच्या घरी जाऊन चहा सुद्धा घेत असतात अशी माहिती आमच्या खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. आज पर्यंत ऐकलं आहे की तलाठ्यांना वाळू माफीये चहा, जेवण करतात मात्र आता युग बदललं असल्याने कदाचित हे होत असेल असे म्हणावे लागेल.
त्या तलाठ्यावर दादू, शिरीष व बाळूने काय जादू केली हे त्यांनाच माहीत कारण सध्या कुणाचेही ट्रॅक्टर नदीत दिसत नाहीत. फक्त हेच बादशाह सध्या नदीत दिसत आहेत.
दरम्यान कालपासून बोरी आई दिव्य लोकतंत्रला आशीर्वाद देत असून त्या परिसरातील अनेक लोकांनीही सोमवारी शांततेची झोप घेतली आहे.
