तक्रारी आल्या आणि त्यात दोषी आढळले तर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही….
प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांसह तलाठ्यांना घेतले धारेवर….
दिव्य लोकतंत्रच्या बातम्यांची दखल
अमळनेर : तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर कामे व त्यावर बसत नसलेला आढा या बाबत दिव्य लोकतंत्रने काही दिवसांपासून बातम्यांचा धडाका लावला आहे. या बाबत काही तक्रारी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज काही कारणास्तव अमळनेर प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांची बैठक घेतली व सर्वांची कान उघडणी करत धारेवर धरले आहे. कामे व्यवस्थित करा, तक्रारी येऊ देऊ नका आणि जर तक्रारी आल्या आणि त्यात कोणीही दोषी आढळले तर त्यांना कागदावर घेतल्याशिवाय राहणार नाही असे देखील त्यांनी तहसीलदार व तलाठी यांना सुनावले असल्याचे आमच्या सुत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान यानंतर तहसीलदार व संबंधित तलाठी यांच्यावर काय फरक पडतो हे पाहणे गरजेचे ठरेल.
