सावखेडा, कामतवाडी, धूरखेडा भागात वाळू माफियांचा सुळसुळाट….
तलाठी महाजन, पाटील, शिंदे यांच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा ?

अमळनेर : तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून याकडे मात्र प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करतांना दिसत आहे. दिव्य लोकतंत्रने गेल्या दोन दिवसांपूर्वी तापीचे समन्वयक तलाठी महाजन, शिंदे, व इतर तलाठ्यांच्या बाबत बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली नसून तहसीलदार देखील सुस्त झोपेत आहेत.
“मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” अशी परिस्थिती सध्या एका अधिकाऱ्याची झाली आहे. नावे समोर येऊनही कारवाई होत नाही. मग “दाल में कुछ काला है !” असे काही वेळेस सामान्य जनतेला देखील वाटायला लागते.
दहीवद तलाठी प्रकाश महाजन, नगाव तलाठी महेंद्र पाटील व गलवाडे तलाठी संदीप शिंदे यांची चांगलीच गट्टी असून ते सजा दूर-दूर जरी असली तरी सावखेडा, कामतवाडी व धूरखेडा सारख्या ठिकाणी जाऊन मलई गोळा करीत असतात. त्यात वाळू माफिया असलेला प्रशांत देशमुख सर्व वाळू माफियांकडून मलई जमा करून वरील तलाठ्यांना देत असतो. मात्र हा माल वरती कुणाकडे जातो की फक्त या तलाठ्यांच्याच खिशात राहतो हे अजून मात्र काळे सहस्य आहे. या बाबत देखील दिव्य लोकतंत्र तपास करीत असून लवकरच तसे वृत्त प्रकाशित केले जाणार आहे.
दरम्यान सदर तलाठ्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशीही मागणी केली जाणार आहे, कारण यांनी वरील भागात वाळूच्या माध्यमातून मोठी संपत्ती जमवली आहे.
