वाळू माफिया आणि अधिकारी यांतील दुवे तलाठी जितू व तलाठी जाधव….
तलाठी जितू व जाधव यांच्या मध्यस्थीने अवैध वाळू उपसा ?

अमळनेर : तालुक्यात आम्ही सभ्य असून एकही रुपया कुणाचा खात नाही. “कर नाही तर डर कशाला” अशी पोकळ भाषा काही अधिकारी वापरत असतात. मात्र आम्हाला हाती आलेल्या माहितीने हे सगळे उघडे पडणार असून त्यांची तक्रार होऊन कारवाई देखील होणार आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमाने होत असून हे कोणाच्या आशीर्वादाने होत आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर दिव्य लोकतंत्र देखील याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करीत होते. तर आता याबाबत स्फोटक पुराव्यांसह माहिती दिव्य लोकतंत्रच्या हाती आली असून हप्ते कसे व कुठून जातात हे देखील समजले आहे.
अमळनेर येथील तलाठी जितू व जाधव या दोघांच्या मध्यस्थीने पांझरा व बोरीतील वाळू वाहतूक सुरू असून हेच दोघे अमळनेर तालुका महसूलच्या प्रमुख अधिकाऱ्याला त्याच्या हिस्सा पोहोचवत आहेत. तर दादू नावाचा वाळू माफिया सर्व वाळू माफियांच्या कडून माल जमा करून ते जितू व जाधव यांना देत असतो. त्या नंतर “मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ या युक्तीप्रमाणे वागत असलेल्या एका अधिकाऱ्याला ते देत असतात. व त्या नंतर हा सर्व खेळ त्या अधिकाऱ्याच्या परवानगीने चालत असतो. मात्र मी कारवाई करीत आहे असे म्हणत अनेक फोन व विचारणाऱ्या लोकांना हा अधिकारी त्याच्या कार्यालयाच्या समोरील वाहनं दाखवत असतो. मात्र ही वाहने ज्याने प्रसाद दिला नाही, त्यांचीच असतात हे लपून राहिलेलं नाही.
आपले पूर्वज एक उदाहरण सांगत असायचे व आताही ते प्रख्यात आहे. “मांजर दूध पीत असतांना ती सर्वांना दिसते मात्र तिला असे वाटते की कोणीच बघत नाहीये”. अशी ह्या अधिकाऱ्याची बाब सध्या झाली आहे. हा अधिकारी खात तर आहे (प्रसाद ) हे अनेकांना समजतंय, माहितीही आहे मात्र त्याला असे वाटतेय की त्याला कोणीच पाहत नाहीये.
याबाबत पुढील सविस्तर वृत्त नक्की वाचा….
