बोरी काठावरील भागात असणारे ट्रॅक्टर व डंपर वाळू चोरीची ग्वाही देताय…
रात्रीस खेळ चाले….

अमळनेर : शहराला लागून असलेल्या बोरी नदीच्या काठावर म्हणजेच बहादरवाडी, गोपाळी, हिंगोणे, अमळनेर शहरातील रुबजीनगर, भोई वाडा, माळी वाडा, कसाली मोहल्ला, पैलाढ आदी भागांमध्ये उभे असलेले ट्रॅक्टर, डंपर व लहान टेम्पो हे ग्वाही देतात की वाळूचा रात्रीस खेळ अत्यंत मोकडा सुरू आहे. मात्र तहसीलदार महोदयांना हे सगळं दृश्य दिसत नाहीये.
या वाहनांच्या चाकांना लटकलेला चिखल, वाळू व थोड्या फार प्रमाणात त्यात असलेली वाळू हे सगळं ओरडून – ओरडून सांगतायेत की आम्ही रात्रीच्या खेळल्या जाणाऱ्या खेळातील वस्तू आहोत. मात्र त्यांचं ओरडणं प्रशासनाला दिसत नाही. कारण 20, 15 आणि 7 च्या गादीवर प्रशासन सुस्त झोपलंय…. म्हणून आता या सगळ्या विषयात कोण कारवाई करणार हे पाहणे गरजेचे ठरेल.
दरम्यान अमळनेर तालुक्यातील वाळूच्या अवैद्य वाहतुकीच्या विरोधात जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिव्य लोकतंत्र कडून तक्रार केली गेली असून लवकरच जिल्ह्याचे पथक अमळनेर तालुक्यात येऊन कारवाई करतील अशी माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे.
